महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सलमान खानला दिलासा, 'सेलमन भोई' गेम हटवण्याचा कोर्टाने दिला आदेश - 'सेलमन भोई' नावाचा गेम

अलीकडे 'सेलमन भोई' नावाचा हा खेळ तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. या गेममध्ये सलमान खानचे हिट अँड रन प्रकरण, काळवीट हत्या व इतर वादग्रस्त विषयांचा गेममध्ये समावेश असल्याचे समजते. या गेम बनवणाऱ्या कंपनीच्या विरोधात सलमानने न्यायालयात धाव घेतली होती. कोर्टाने गेमच्या निर्मात्यांना पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत गेम पुन्हा सुरू रीलॉन्च-रीक्रिएट करण्यास मनाई केली आहे.

सलमान खान
सलमान खान

By

Published : Sep 8, 2021, 3:25 PM IST

मुंबई - मुंबई न्यायालयाने 'सेलमन भोई' नावाच्या खेळावर तात्पुरती बंदी घातली आहे. अलीकडे 'सेलमन भोई' नावाचा हा खेळ तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. या गेममध्ये सलमान खानचे हिट अँड रन प्रकरण, काळवीट हत्या व इतर वादग्रस्त विषयांचा गेममध्ये समावेश असल्याचे समजते. मात्र, आता मुंबई कोर्टाने हा गेम गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. न्यायाधीशांनी गेम मेकर पॅरोडी स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड आणि गुगल एलएलसीला 'सेलमन भोई' हा गेम गूगल प्ले स्टोअरमधून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहे. कोर्टाने गेमच्या निर्मात्यांना पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत गेम पुन्हा सुरू रीलॉन्च-रीक्रिएट करण्यास मनाई केली आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश केएम जयस्वाल म्हणाले की, बचावकर्त्याने सलमान खानची ओळख त्याच्या व्यावसायिक फायद्यासाठी वापरली आहे. न्यायाधीशांनी आपल्या आदेशात असेही म्हटले आहे की, गेम आणि त्याचे फोटो पाहता सलमान खानशी साधर्म्य असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. आणि सलमान खानने गेम इन्स्टॉल करणे, तयार करणे आणि चालवणे याला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे त्याच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे आणि सलमानची प्रतिमा डागाळली गेली आहे.

हेही वाचा - अक्षय कुमारला मातृशोक, वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ABOUT THE AUTHOR

...view details