मुंबई - राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांच्या भूमिका असलेल्या 'छलांग' चित्रपटाचे शीर्षक गीत रिलीज झाले आहे. 'केअर नी करदा' आणि 'तेरी चुडियाँ' ही या चित्रपटाची दुसरी गाणी यापूर्वीच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत आणि आता हा नवीन टायटल ट्रॅक तयार आहे. हे दमदार गाणे लव्ह रंजन यांनी लिहिले आहे आणि प्रसिद्ध संगीतकार हितेश सोनिक यांनी संगीत दिले आहे. हे गाणे ज्येष्ठ गायक दलेर मेहंदी यांनी गायले असून राजकुमार राव, नुसरत भरुचा आणि झीशान अयूब यांच्यावर चित्रित झाले आहे.
उत्कट, प्रेरणादायी 'छलांग' चित्रपटाचे शीर्षक गीत रिलीज - The title song of the movie 'Chhalang'
'केअर नी करदा' आणि 'तेरी चुडियाँ' या गाण्यानंतर 'छलांग' चित्रपटाचे शीर्षक गीत रिलीज झाले आहे. हे गाणे ज्येष्ठ गायक दलेर मेहंदी यांनी गायले असून राजकुमार राव, नुसरत भरुचा आणि झीशान अयूब यांच्यावर चित्रित झाले आहे.
या सुपर एनर्जेटिक साउंडट्रॅकबद्दल बोलताना दिग्दर्शक हंसल मेहता म्हणाले, '''ले छलांग या चित्रपटातील हे माझे आवडते गाणे आहे. हे गाणे परिवर्तन, विश्वास आणि दृढनिश्चय याबद्दल आहे. हे गाणे मला नेहमीच प्रेरणा देते. दलेर मेहंदी यांनी हे पूर्ण उत्कटतेने आणि उर्जेने गायले आहे आणि लव्ह रंजन यांनी सुंदरपणे लिहिले आहे.''
संगीतकार हितेश सोनिक म्हणाले, '''ले छलांग हे एक प्रेरणादायक गाणे आहे, जे चित्रपटाची मूळ थीम यात अधोरेखित आहे. हे गाणे माझ्यासाठी आणखी विशेष झाले आहे कारण दलेर मेहंदीजींनी माझी रचना गायली आहे. त्यांच्यासारखा दुसरा आवाज नाही. त्याचा आवाज मजबूत आहे आणि ते मनापासून गातात. लव आणि मी एकत्र काही गाण्यांवर काम केले आहे आणि त्यांच्याबरोबर काम करण्यास मजा येते. हे गाणे लोकांच्या भावनांना स्पर्श करून त्यांना प्रेरणा देत असेल तर ते आमच्यासाठी मोठा पुरस्कार ठरेल. अशी आणखी गाणी बनवण्यास प्रेरणा मिळेल.''