राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर अभिनित ‘बधाई दो’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि प्रतीक्षा आहे. त्याचा ट्रेलर आणि शीर्षक गीतातून चित्रपटातील गमतीशीर आणि मजेदार व्हिज्युअल्स प्रदर्शित केल्यानंतर, 'बधाई दो'च्या निर्मात्यांनी त्याचे दुसरे गाणे 'अटक गया' रिलीज केले आहे. हे गाणे प्रेक्षकांच्या अंत:करणाचा ठाव घेण्यात यशस्वी होईल. हे रोमँटिक गाणे वरुण ग्रोव्हरने लिहिले आहे, अमित त्रिवेदी यांनी संगीत दिले आहे आणि अरिजित सिंग आणि रुपाली मोघे यांनी ते गायले आहे.
सुंदर बीट्स, मधुर शब्द आणि सामर्थ्यशाली व्हिज्युअल्सच्या मिश्रणासोबत, हे गाणे सर्व प्रेमींसाठी एक परिपूर्ण सांगीतिक मेजवानी आहे. हे सुंदर गाणे उचंबळलेल्या भावना, मधुर क्षण आणि प्रमुख जोडीमधील केमिस्ट्री व्यक्त करते. हे गाणे शार्दुल आणि सुमीच्या अतरंगी लग्नाचे वर्णन करते आणि त्या भूमिका वठविल्या आहेत राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर या कलाकारांनी. या गाण्यासोबत व्हॅलेंटाइन डे साजरा करायला अनेकजण नक्कीच उत्सुक असतील.