महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Zhund song Lafda Zhala : 'झिंगाट' होऊन नाचायला लावणारे 'झुंड'चे 'लफडा झाला' गाणे रिलीज -

नागराज मंजुळे यांच्या हिंदी पदार्पणाच्या 'झुंड' चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक करीत आहेत. ४ मार्च रोजी या चित्रपटाचे प्रदर्शन देशभर होणार आहे. याचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटातील ''लफडा झाला' हे दुसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

झुंड' चित्रपटातील 'लफडा झाला' गाणे रिलीज
झुंड' चित्रपटातील 'लफडा झाला' गाणे रिलीज

By

Published : Feb 19, 2022, 12:35 PM IST

मुंबई - झुंड चित्रपटाबद्दल तमाम रसिकांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. काही दिवसापूर्वी याचा टिझर आणि एक गाणे चाहत्यांना भुरळ पाडून गेले. आता या चित्रपटातील लफडा झाला हे नवीन गाणे रिलीज करण्यात आले आहे.

'लफडा झाला' हे उडत्या चालीचे, ठेका आणि ताल धरायला लावणारे पार्टी साँग आहे. यावर पडद्यावर तरुणाई थिरकताना दिसते. 'सैराट' सिनेमातही 'झिंगाट'वर तरुणांनी असाच ताल धरला होता, याची आठवण हे गाणे करुन देते. अजय अतुल यांनी 'झिंगाट' प्रमाणेच या गाण्यावरही थिरकायला भाग पाडले आहे. अर्थातच हे गाणे अजय गोगावले यांनी गायले असून अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गीत लिहिले आहे.

नागराज मंजुळे यांच्या हिंदी पदार्पणाच्या 'झुंड' चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक करीत आहेत. ४ मार्च रोजी या चित्रपटाचे प्रदर्शन देशभर होणार आहे. याचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. 'आया ये झुंड है' हे पहिले गाणे रिलीज करण्यात आल्यानंतर 'लफडा झाला' या गाण्यामुळे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू झाले आहे.

हेही वाचा - अजय अतुलचे 'झुंड'मधील पहिले दणदणीत गाणे रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details