मुंबई- अभिनेता जॉन अब्राहमची भूमिका असलेला 'सत्यमेव जयते' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाचा दुसरा भाग तयार करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा हा चित्रपट गेल्या वर्षी २ ऑक्टोबरला रिलीज होणार होता. मात्र कोरोनामुळे याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते.
सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 'सत्यमेव जयते २' या चित्रपटाचे रिलीज आणखी पुढे ढकलल्याचे निवेदन निर्मात्यांच्या वतीने प्रसिध्द करण्यात आलंय.
मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात जॉन अब्राहमसह मनोज वाजपेयी आणि दिव्या खोसला कुमारदेखील मुख्य भूमिकेत आहेत. २०१८च्या अॅक्शन ड्रामा 'सत्यमेव जयते' चा हा सिक्वेल आहे. भूषण कुमार या चित्रपटाचे निर्माता आहेत.