मुंबई- अभिनेता अक्षय कुमारचा नवीन चित्रपट 'पृथ्वीराज' 21 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु भारतातील कोरोनाचे नवीन प्रकार ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
एका सूत्राने सांगितले की, “तुमच्याकडे एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे जो देशभरातील प्रेक्षकांना आवडेल, त्यामुळे तुम्ही एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही. सिनेमा हॉल प्रेक्षकांनी खचाखच भरलेला असताना 'पृथ्वीराज' प्रदर्शित झाला पाहिजे. हा चित्रपट आता रिलीज झाला तर त्याचा उद्देश पूर्ण होऊ शकणार नाही. आपण प्रतीक्षा केली पाहिजे कारण जेव्हा तो रिलीज होईल तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण करेल. 'ओमायक्रॉनची परिस्थिती लक्षात घेऊन चित्रपटाची पुढील तारीख ठरवली जाईल.'