मुंबई- चित्रपट जगतातील तरुण दिग्दर्शक अयान मुखर्जी त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट 'ब्रह्मास्त्र' चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. बुधवारी (15 डिसेंबर) लाँच होत असलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या पहिल्या मोशन पोस्टरची चाहते वाट पाहत आहेत. या खुशखबरीने रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांची प्रतीक्षाही संपली आहे. चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर लॉन्च होण्यापूर्वीच 'ब्रह्मास्त्र'ची रिलीज डेट जाहीर झाली आहे.
बॉलिवूडचे प्रेमळ जोडपे रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. गेल्या तीन वर्षांपासून या चित्रपटाची तयारी सुरू होती. या चित्रपटाचे शुटिंग अंतिम टप्प्यात असून रिलीजची तारीखही जाहीर झाल्याने चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
या दिवशी होणार ब्रम्हास्त्र रिलीज