मुंबई- १९८७ मध्ये आलेल्या ‘पती, पत्नी और वो’ चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. तर, आता चित्रपटाच्या रिमेकमध्ये कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.
हा चित्रपट ६ डिसेंबर २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पती, पत्नी और वो’ हा चित्रपट बी. आर. चोप्रा यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटाच्या रिमेकची जबाबदारी मुदस्सर अजीज यांनी स्वीकारली आहे. तर भूषण कुमार, कृष्णन कुमार, रेणू चोप्रा आणि जुनो चोप्रा यांची निर्मिती असणार आहे.