मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तब्बल १३ वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. निकम्मा या आगामी साबीर खान यांच्या चित्रपटात ती झळकेल. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली असून ५ जून २०२० ला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
शिल्पा शेट्टीचे पुनरागमन व अभिमन्यूचे पदार्पण असलेल्या 'निकम्मा'च्या रिलीजची तारीख ठरली - Abhimanyu Dasani
अभिमन्यू दासानी आणि श्रायर्ली सेठी ही नवी जोडी निकम्मा चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साबीर खान करत आहेत. पुढील वर्षी ५ जून २०२० ला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
![शिल्पा शेट्टीचे पुनरागमन व अभिमन्यूचे पदार्पण असलेल्या 'निकम्मा'च्या रिलीजची तारीख ठरली Nikamma](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5398256-thumbnail-3x2-tt.jpg)
बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्रींची मुले सिनेमात झळकण्याची मोठी परंपरा आहे. आता यात अभिमन्यू दासानीची भर पडत आहे. निकम्मा या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. प्रसिद्ध मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीचा तो मुलगा आहे. निकम्मा चित्रपटात अभिमन्यूची आणि शीर्ले सेठिया यांची जोडी पाहायला मिळेल. हा एक अॅक्शन मनोरंजन चित्रपट असेल.
'निकम्मा' चित्रपटातील अभिमन्यू दासानी आणि शीर्ले सेठिया यांच्या एका दृष्याची झलक असलेला फोटो शेअर करीत ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी रिलीज डेटची घोषणा केली आहे.