महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कोरोनाची चाचणी करण्यास रेखाने दिला नकार, बंगला निर्जंतुकीकरण करण्यास बीएमसीला मनाई - रेखाच्या गार्डला कोरोानाची बाधा

सिक्युरिटी गार्डची कोरोना विषाणू चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी स्वतःची चाचणी करण्यास नकार दिला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) वांद्रे येथील बॅन्डस्टँड परिसरातील रेखाचा बंगला सील केला आहे. तथापि, रेखाने बंगला सॅनिटाईज करण्यास मनाई केली आहे.

Rekha
अभिनेत्री रेखा

By

Published : Jul 15, 2020, 4:44 PM IST

मुंबई - अभिनेत्री रेखाच्या सुरक्षा रक्षकाची गेल्या आठवड्यात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. प्रतिबंधात्मक उपायांनुसार अभिनेत्री व घरात राहात असलेल्या सर्वांची कोव्हिड-१९ चाचणी करणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेखा चाचणी करण्यास तयार नाहीत. तसेच बंगल्याची स्वच्छता करण्यासही रेखा यांनी बीएमसीला नकार दिला आहे.

वेगवेगळ्या अहवालांनुसार, अधिकारी तिच्या बंगल्यात पोहोचले तेव्हा रेखाचा मॅनेजर फरजानाने त्यांना रेखा यांचा नंबर दिला आणि बंगल्याची स्वच्छता करण्यास येण्यापूर्वी रेखा यांना फोन करण्यास सांगितले. नंतर अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केले की, रेखा यांना कोरोनाची चाचणी करण्याची गरज नाही. कारण ज्यांना व्हायरसचे निदान झाले आहे अशा कोणाशीही त्या संपर्कात आल्या नव्हत्या.

हेही वाचा - बच्चन कुटूंबीयांच्या संपर्कात असलेले 26 जण कोरोना 'निगेटिव्ह'

गेल्या आठवड्याच्या शेवटी, विविध वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार रेखा यांचा स्प्रिंग्ज नावाचा बंगला कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि बीएमसीने तेथील परिसर पूर्णपणे स्वच्छ केला आहे. तथापि, गेल्या काही आठवड्यांपासून घरात क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्या रेखा यांची कोविड टेस्ट झाली आहे की नाही हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, रेखाच्या बंगल्याशेजारी असलेल्या बंगल्यांमध्ये काम करणाऱ्या ४ चौकीदारांना बीएमसीने कोविड -१९ सुविधा असलेल्या ठिकाणी हलविण्यात आले आहे.

संबंधित बातमीनुसार, बच्चन कुटुंबातील चार सदस्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या शनिवारी अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन घरी क्वारंटाईनमध्ये राहात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details