महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'आरआरआर’च्या ५ भाषांच्या थिएट्रिकल हक्कासाठी ३४८ कोटींची ‘विक्रमी’ ऑफर! - 'आरआरआर’ थिएट्रिकल हक्क

'आरआरआर’ हा चित्रपट १० भाषांत प्रदर्शित होणार असून आताच ५ भाषांच्या थिएट्रिकल हक्कासाठी ३४८ कोटींची विक्रमी ऑफर आली आहे. यावरून कल्पना येईल की एस एस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ बद्दल केवढी हवा आहे आणि या पॅन-इंडिया चित्रपटाबद्दलचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

RRR theatrical right
'आरआरआर’ थिएट्रिकल हक्क

By

Published : Mar 25, 2021, 1:10 PM IST

मुंबई - एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ची घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे. या मॅग्नम ओपसमध्ये दाक्षिणात्य, हिंदी आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील अनेक बडी नाव काम करताहेत. ज्यु. एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, समुद्रीकणी आणि ऑलिव्हिया मॉरिस व अ‍ॅलिसन डूडी हे या चित्रपटाचा भाग आहेत. हा चित्रपट १० भाषांत प्रदर्शित होणार असून आताच ५ भाषांच्या थिएट्रिकल हक्कासाठी ३४८ कोटींची विक्रमी ऑफर आली आहे. यावरून कल्पना येईल की एस एस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ बद्दल केवढी हवा आहे आणि या पॅन-इंडिया चित्रपटाबद्दलचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

‘मला आरआरआरचा संपूर्ण कॅनव्हास पूर्णपणे नवीन ब्रशने रंगवायचा आहे जेणेकरून मी तयार केलेल्या विश्वात शौर्य, उर्जा आणि धैर्य असेल’, असे राजामौली म्हणाले. त्यांना स्वातंत्र्यसैनिकांना सुपरहिरो म्हणून पेश करायचे आहे. चित्रपटाच्या कथानकाविषयी आरआरआर आणि त्यांच्या काल्पनिक गोष्टींबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनाचे स्पष्टीकरण देताना राजामौली म्हणतात की, "मी माझ्या कल्पनेचा उपयोग व्यक्तिरेखांना मूर्त रूप देण्यात करतो. त्या व्यक्तिरेखा जगाला कशा वाटतील याबद्दल मी उत्सुक आहे. तसेच माझ्या कल्पनेतील सुपरहिरो आताच्या काळात कसे वागले असते हे पाहून सर्वांनाच अचंबा वाटेल.”

हेही वाचा - दिग्दर्शक विवेक वाघ यांच्या 'जक्कल' या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर!

‘आरआरआर’ हा चित्रपट अशा दोन स्वातंत्र्यसेनानींचा आहे ज्यांनी स्वातंत्र्यलढ्याची दिशाच बदलली. खऱ्या स्वातंत्र्यलढ्याला काल्पनिकतेची जोड देत या चित्रपटाची पटकथा बांधली गेली आहे. डीव्हीव्ही दानय्या निर्मित, ‘आरआरआर’चे दिग्दर्शन, भारतातील प्रख्यात ‘बाहुबली’ दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी केले असून हा चित्रपट तेलुगु, तमिळ, हिंदी, मल्याळम, कन्नड आणि इतर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - कृती सेनॉनला वाटले प्रभास 'लाजाळू' आहे, पण..

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details