महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गांधी जयंती विशेष: 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटातील गांधीजींची 'ती' ५ तत्वे ठरतात मार्गदर्शक

गांधी जयंती निमित्ताने जाणून घेवूया गांधीगिरीचे ५ तत्व. जीवनामध्ये कायम उपयोगी पडतीलं, असे गांधीजींचे विचार 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटामध्ये मांडण्यात आले आहेत.

गांधी जयंती

By

Published : Oct 2, 2019, 7:50 AM IST

मुंबई - आज देशभरात महात्मा गांधी यांची १५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. महात्मा गांधींची अंहिसावादी विचारसरणी आजच्या काळासाठीही महत्वाची आहे. म्हणूनच, बॉलिवूडच्या चित्रपटातूनही गांधीगिरीचं महत्व दाखवून दिलं आहे. यामध्ये संजय दत्तच्या 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटातून गांधीगिरीचे पाच तत्व हमखास आजही सर्वांच्या उपयोगी पडू शकतात.

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा 'लगे रहो मुन्नाभाई' हा चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मराठीचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी महात्मा गांधी यांची भूमिका साकारली होती. संजय दत्तने तर, 'मुन्नाभाई एम. बी. बी. एस.' चित्रपटातून चाहत्यांची मने जिंकलीच होती. या चित्रपटातही त्याने मुन्नाभाईची भूमिका साकारली होती. मात्र, यामध्ये दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली महात्मा गांधी यांची भूमिका विशेष लक्षणीय ठरली.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटातून देण्यात आलले हे पाच धडे....

अहिंसा -

'अहिंसा' हे गांधीजींचे सर्वात मोठे तत्व होते. काहीही झालं, तरी अहिंसेनेच आपल्या कठीण समस्या सोडवता आल्या पाहिजे, हे त्यांनी शिकवले. या चित्रपटातही मुन्नाभाई भांडण करण्यासाठी निघालेला असतो, मात्र, गांधीजींच्या या शिकवणीमुळे तो अहिंसेला महत्व देतो.

नेहमी खरे बोलणे -

खोटं बोलणं सोप्प असतं. मात्र, खोटं फार काळ टिकत नाही. खरं बोलणं हे नेहमी कठीण असतं. मात्र, नेहमी खरं बोलण्याने आपण दुसऱ्यांची मने जिंकू शकतो. या चित्रपटात मुन्नाभाई देखील विद्या बालनसमोर आपली खोटी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, आपण खोटं बोलतोय, ही भावना त्याला सतावत असते.

शत्रुवर प्रेम करा -

आपला जर कोणी शत्रू असेल तर, त्याच्यासोबत शत्रुत्वाची भावना न ठेवता त्याच्याशी मैत्रीपूर्ण वागावे, हा धडा देखील या चित्रपटातून मिळतो. मुन्नाभाई ज्याप्रमाणे त्याचा शत्रू असलेल्या बोमन इराणी यांना दररोज फुले पाठवतो. त्याचप्रमाणे आपणही इतरांच्या भल्याचा विचार केला पाहिजे, ही शिकवण यातून मिळते.

निस्वार्थ प्रेम करा -

आपण जर कोणावर प्रेम करत असू, तर त्यामध्ये आपला कोणताही स्वार्थ नसावा. आपण सर्वांवर निस्वार्थ प्रेम करायला हवे. या चित्रपटात विद्या बालन मुन्नाभाई जसा असतो, तसा त्याला स्वीकारते. त्यामुळे कोणावरही निस्वार्थ प्रेम करावे, हा धडा या चित्रपटातून मिळतो.

संयम हीच यशाची गुरुकिल्ली आहे -

गांधीजींनी दिलेल्या धड्यापैकी हा धडा देखील सर्वांसाठी उपयोगी ठरतो. कोणतंही कार्य करताना आपण संयम ठेवणं गरजेचं असतं. कोणतही कठीण कार्य असो, त्याला संयमाने सामोरे गेलं तर नक्की यश मिळतं, हा धडा या चित्रपटातून मिळतो.

ABOUT THE AUTHOR

...view details