मुंबई - मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणावर आधारित ऐतिहासिक चित्रपटाचे काम सुरू झाले आहे, अशी घोषणा निर्मात्यांनी शनिवारी शिवजयंतीनिमित्त केली. “बाल शिवाजी” असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाला इरॉस इंटरनॅशनल, आनंद पंडित मोशन पिक्चर्स, रवी जाधव फिल्म्स आणि लिजेंड स्टुडिओज यांचा पाठिंबा असेल.
छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या शौर्यासाठी, लष्करी प्रतिभा आणि नेतृत्वासाठी ओळखले जाते.
निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ते १६ या वयादरम्यान त्यांनी स्वराज्याचा पाया रचला त्या विषयाला केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात येणार आहे.