महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे अभिनेत्रीने स्वच्छ केले रेल्वेमधील सीट - Raveena Tondon news

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आत्तापर्यंत देशातील २५८ पेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

Raveena Tondon Cleans Train Cabin to be safe from Corona Virus
कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे अभिनेत्रीने स्वच्छ केले रेल्वेमधील सीट

By

Published : Mar 21, 2020, 8:35 PM IST

मुंबई -कोरोना विषाणूची दहशत पाहता सर्वच आपल्या सुरक्षिततेसाठी जागरुक झाले आहेत. कलाविश्वातील कलाकारांनीही स्वत:ला काही दिवसांकरता आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांनाही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाची भीती इतकी वाढली आहे की, अभिनेत्री रविना टंडन हिने प्रवासादरम्यान रेल्वेची सीट स्वच्छ केली.

रविनाने तिचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती सॅनिटायझरने रेल्वेतील सीट स्वच्छ करताना दिसते. 'नंतर सॉरी बोलण्यापेक्षा आधीच सुरक्षित राहणं अधिक चांगलं असतं', असे कॅप्शन तिने या व्हिडिओवर दिले आहे. तसेच, स्वत:सह कुटुंबाची काळजी घेण्याचेही तिने म्हटले आहे.

हेही वाचा -कोरोना व्हायरसवर नंदेश उमप यांचा हा पोवाडा एकदा ऐकाच!

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे आत्तापर्यंत देशातील २५८ पेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या वाढत आहे. बॉलिवूडमध्ये कनिका कपूर ही कोरोना लागण झालेली पहिली सेलेब्रिटी ठरली आहे.

देशातील विविध ठिकाणं पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. तसेच रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

हेही वाचा -अभिजीत भट्टाचार्यांच्या 'या' सुप्रसिद्ध गाण्यावरून तरुणाने तयार केलं कोरोना सॉन्ग, व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details