महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

विजय देवराकोंडाच्या भेटीसाठी रश्मिका मंदान्ना अमेरिकेला रवाना? - पाहा फोटो..

रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यूएसएला रवाना झाली आहे. तिथे ती 'लाइगर' (Liger)चित्रपटाच्या शूटिंगमध्ये काम करीत असलेल्या विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) याची भेट घेणार आहे. यापूर्वी मंदाना आणि विजय देवराकोंडा यांनी या सिनेमाचे शुटिंग गोव्यात एकत्र केले होते.

रश्मिका मंदान्ना अमेरिकेला रवाना
रश्मिका मंदान्ना अमेरिकेला रवाना

By

Published : Nov 24, 2021, 6:49 PM IST

हैदराबाद (तेलंगणा): दाक्षिणात्य स्टार अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (South star Rashmika Mandanna), लवकरच 'मिशन मजनू' (Mission Majanu) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या ती यूएसएला रवाना झाली आहे. तिचा 'गीता गोविंदम' (Geeta Govindam) चित्रपटातील सहकलाकार विजय देवरकोंडाच्या (Vijay Deverakonda ) भेटीसाठी जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विजय अमेरिकेत त्याच्या आगामी 'लाइगर' ( Liger) चित्रपटाचे शुटिंग करीत आहे. त्याचा हा बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट आहे.

मंदानाने सोशल मीडिया हँडलवर तिच्या एअर तिकिटाचे फोटो शेअर केले आहेत. आपण लवकरच परत येणार असल्याचे तिने चाहत्यांना कळवले आहे.

रश्मिका मंदान्ना अमेरिकेला रवाना

बुधवारी सकाळी, रश्मिकाने इंस्टाग्राम स्टोरीजवर जाऊन तिच्या पासपोर्टचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले: "दूर जात आहे". रश्मिकाने ती कोठे जात आहे याचा उल्लेख केला नाही, परंतु एका वेबलॉइड अहवालात दावा केला आहे की ती अभिनेता विजय देवरकोंडाला भेटण्यासाठी यूएसएला जात आहे. तिच्या पासपोर्टचा फोटो शेअर करत तिने लिहिले की, "यावेळी तुमच्यापासून खूप दूर आहे पण लवकरच परत येईन."

रश्मिका मंदान्ना अमेरिकेला रवाना

काही तासांनंतर, अभिनेत्री मंदानाने फ्लाइटमधून एक सेल्फी शेअर केला आहे आणि चाहत्यांना ती कुठे जात आहे याचा अंदाज घेण्यास सांगितले.

रश्मिकाने विजयच्या शूटिंगच्या ठिकाणी भेट देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील, मंदान्ना हिने लाइगरच्या गोव्याच्या शुटिंगच्यावेळी देवराकोंडाला भेट दिली होती.

विजय आणि मंदानाने 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' या तेलगू चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे आणि चाहत्यांना असे वाटते की त्यांच्यातील ही ऑनस्क्रिन केमिस्ट्री ऑफ कॅमेराही दिसून येत आहे.

रश्मिका आणि विजय देवराकोंडा यांच्यात नाते निर्माण होत असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून पाहायला मिळत आहे. मात्र दोघांनीही यावर कधीच भाष्य केलेले नाही.

वर्क फ्रंटवर, स्पाय थ्रिलर 'मिशन मजनू' व्यतिरिक्त, अभिनेत्री रश्मिका मंदाना आगामी 'गुडबाय' या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत झळकणार आहे. तिच्याकडे अल्लू अर्जुन अभिनीत 'पुष्पा' हा तेलगू चित्रपट देखील आहे.

हेही वाचा - सुष्मिता सेनने शेअर केले आर्या 2 चे आक्रमक मोशन पोस्टर

ABOUT THE AUTHOR

...view details