मुंबई - रश्मिका मंदना बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज असल्याच्या बातम्या आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत आलो आहोत. नॅशनल क्रश असलेली ही अभिनेत्री बॉलिवूड पदार्पणापूर्वी देशभर करोडो चाहत्यांच्या ह्रदयाची धडकन बनली आहे. काही महिन्यापूर्वीच तिचा 'टॉप टकर' हा व्हिडिओ अल्बम रिलीज झाला होता. उछना अमित, बादशाप, युवान शंकर राजा आणि जोनिता गांधी यांच्या आवाजातील हे गाणे सुपरहिट ठरले होते यातील रश्मिकाचा डान्स परफॉर्मन्सही वेड लावणारा होता.
याच गाजलेल्या टॉप टकर या गाण्यावर थिरकतानाचा एक व्हिडिओ रश्मिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या गाण्याला मूळ गाण्या इतकाच प्रतिसाद चाहते देत आहेत.