महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

#BeTheMiracle च्या माध्यमांतून अभिनेत्री राशी खन्ना पुरवते कोरोना महामारीने ग्रस्त लोकांना अन्न! - #bethemiracle

राशी खन्ना ने #BeTheMiracle ची स्थापना केली असून गरजूंना अन्न वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ज्यांनी आपले जीवनमान गमावले आहे, अशा लोकांच्या मदतीसाठी ती अथक परिश्रम घेत आहे.

#BeTheMiracle
राशी खन्ना

By

Published : Jun 14, 2021, 12:03 PM IST

मुंबई -कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर असून संपूर्ण देश पोळला जातोय. त्यामुळे लादण्यात आलेले लॉकडाउन्स आणि लॉकडाउन्समुळे बिघडलेल्या आथिर्क घडीला सावरण्याचा, देशाचा आणि सामान्यजनांचाही, प्रयत्न सुरु आहे. परंतु गरिबांना कठीण दिवस आलेत त्यामुळे त्यांची मदत करण्याकरिता अनेकजण पुढे आलेत ज्यात अभिनेत्री राशी खन्ना ही मोडते. लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका बसलेल्या जनतेच्या मदतीसाठी राशी धावून आली असून कोरोना महामारीने ग्रस्त लोकांना अन्न पुरवत आहे. राशी प्रामुख्याने तेलगू आणि तामिळ चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे.

#BeTheMiracle


मदत करण्यासाठी प्रोत्साहित
राशी खन्ना ने #BeTheMiracle ची स्थापना केली असून गरजूंना अन्न वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ज्यांनी आपले जीवनमान गमावले आहे, अशा लोकांच्या मदतीसाठी ती अथक परिश्रम घेत आहे. राशीने समविचारी आणि दयाळू मनाने लोकांना पुढे येण्यास आणि ज्यांना या साथीच्या रोगात मदत आवश्यक आहे त्यांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे ठरविले आहे.

राशी खन्ना
राशीची #BeTheMiracle रोटी बँक आणि इतर बऱ्याच स्वयंसेवी संघटनांशी संबंधित आहे जे विशेषत: लॉकडाऊनमध्ये हलाखीच्या परिस्थितीत राहत आहेत. काही वृद्धाश्रमांमध्ये अन्न पोहोचवत असून मुक्या प्राण्यांनासुद्धा मदत करीत आहेत. कारण कुटुंब आणि मित्रांकडून मिळणारी देणगी पुरेशी नसते. त्यामुळे तिच्या संस्थेने सध्य परिस्थितीची विदारकता दर्शविणारा व्हिडीओ बनविला असून त्यामुळे लोकांना कल्पना येईल की गरीब जनता किती हालअपेष्टांत जगत आहे आणि ते मदतीसाठी पुढे येतील.

लोकांना मदत करण्याचे आवाहन
या उपक्रमाबद्दल बोलताना राशी खन्ना म्हणाली, "साथीच्या आजाराने ग्रस्त लोकांचे वास्तव जीवन हृदयस्पर्शी आहे. #BeTheMiracle रोटी बँकतर्फे शक्य असेल तेवढी मदत मी आणि माझी टीम करतच आहे. माझी लोकांना विनंती आहे की, आपल्या देशातील अंतर्गत भागातील बरेचजण उपासमारीने मरत आहेत. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. खूप मोठीही नको परंतु शक्य असेल तेवढी मदत करा, असे मी तुम्हा सर्वांना आवाहन करीत आहे. आपण एकत्रितपणे कोरोनाला हरवू शकतो आणि आपल्या गरीब देशवासियांचे प्राण वाचवू शकतो. एकजुटीत सामर्थ्य आहे आणि आपण एकत्रितपणे मदत करून पीडितांच्या आयुष्यातला चमत्कार बनू शकतो. लोकांनी अंतःकरणे उघडून दान करावे अशी माझी इच्छा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details