मुंबई - अभिनेता रणवीर शौरीची कार मुंबई पोलिसांनी जप्त केली आहे. तो घरातील नोकराला मेडिकल इमर्जन्सीमध्ये घेऊन जात असताना ही कारवाई झाल्याचे रणवीरचे म्हणणे आहे.
रणवीरने यानंतर ट्विटरची एक मालिकाच सुरू केली. आपल्यावर पोलिसांकडून कसा अन्याय झालाय याचा पाढाच त्याने ट्विटरवर वाचून दाखवलाय. त्याने म्हटलंय की, त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकराच्या गर्भवती पत्नीला तो रुग्णालयात घेऊन जात होता. मुलाचा जन्म ही गष्ट इमर्जन्सी असू शकत नसल्याचे पोलिस अधिकाऱ्याने त्याला बोलून दाखवले. शौरीने ट्विटरवर लिहिलंय, '@MumbaiPolice माझ्या घरातील नोकराच्या पत्नीला बाळंतपणासाठी घेऊन जात असताना माझी कार जप्त करण्यात आली आहे. इन्चार्ज ऑफिसरने सांगितले की मुलाचा जन्म ही गोष्ट इमर्जन्सीमध्ये बसत नाही. प्लिज मला सल्ला द्या.'