महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रणवीर म्हणतो, मी आजही स्वतःला स्टार नाही, तर लहान मुल समजतो - priyanka chopra

चित्रपटाचं शूटींग आटपून बाहेर येताना असो वा विमानतळावर असो, कलाकार समोर दिसताच अनेकांचे कॅमेरे त्यांच्यावर असतात. अशावेळी अनेक कलाकार छायाचित्रकारांवर भडकून तेथून निघून जातात. मात्र, रणवीर नेहमीच त्यांना हसत हसत पोज देताना दिसतो.

रणवीर सिंग

By

Published : Jul 12, 2019, 6:01 PM IST

मुंबई- चित्रपटसृष्टीत कोणा दिग्दर्शक वा कलाकारासोबत काहीही कनेक्शन नसताना कोणत्याही ओळखीशिवाय स्वतःला सिद्ध करून दाखवणाऱया कलाकारांची संख्या खूपच कमी आहे. अशात प्रत्येकाच्या मनात घर बनवणारा रणवीर याचंच एक उत्तम उदाहरण. स्वतःच्या अभिनय कौशल्याने गेली १० वर्ष बॉलिवूड गाजवणारा हा अभिनेता आपल्या नम्र स्वभावामुळे चांगलाच चर्चेत असतो.

चित्रपटाचं शूटींग आटपून बाहेर येताना असो वा विमानतळावर असो, कलाकार समोर दिसताच अनेकांचे कॅमेरे त्यांच्यावर असतात. अशावेळी अनेक कलाकार छायाचित्रकारांवर भडकून तेथून निघून जातात. मात्र, रणवीर नेहमीच त्यांना हसत हसत पोज देताना दिसतो. याबद्दल एका मुलाखतीत रणवीरला विचारले असता, आपण अजूनही स्वतःला एक स्टार न समजता लहान मुलगा समजतो, असे उत्तर रणवीरने दिले.

यासोबतच त्याने अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत झालेलं आपलं संभाषणही सांगितलं. रणवीर म्हणाला, प्रियांका मला म्हणते, तू तो मुलगा आहेस, ज्याला या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये की तो आज एक स्टार झाला आहे. जो आजही हेच बोलतो, की आई मी स्टार झालो, बघ हे लोक माझा फोटो काढतात, असे म्हणत रणवीर हसू लागला. दरम्यान रणवीर सध्या आपल्या आगामी '८३' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. ८३ च्या वर्ल्डकपवर आधारित असलेल्या या चित्रपटात तो कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details