मुंबई - शकुन बत्रा दिग्दर्शित आगामी रोमँटिक चित्रपट 'गहराइयाँ'चे प्रमोशन जोरात सुरू आहे. यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण दिवस रात्र प्रमोशन करीत आहे. तिचा पती रणवीर सिंगही दीपिकाच्या या चित्रपटावर खूश दिसत आहे. या चित्रपटातील 'बेकाबू' या गाण्याच्या ट्रॅकवर तो दीपिकासोबत चालत्या गाडीतच थिरकतानाचा एक व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
लहान मुलांप्रमाणे उत्साह असलेल्या या रणवीर सिंगच्या व्हिडिओवर दीपिकाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचे आभार मानत तिने लिहिले, "माय बिगेस्ट चीअरलीडर! आय लव्ह यू!" पोस्ट केल्यानंतर काही तासांतच या पोस्टला दोन दशलक्ष लाईक्स मिळाले. चाहत्यांनी कमेंट विभागातही या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
"काय ट्रॅक आहे!" असे एका चाहत्याने लिहिले.