मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आपल्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतो. त्यासोबतच वेगवेगळ्या लूकमुळेही चर्चेत असतो.
रणवीर बॉलिवूडचा असा अभिनेता आहे जो नेहमी आपला लूक आणि आऊटफिट्स सर्वांहून वेगळा ठेवतो. अलिकडेच रणवीरने एक फोटो शेअर केलाय. यातून स्पष्टपणे दिसतंय को तो आपल्या लूकसाठी प्रयोग करीत होता.
रणवीरने या लूकचे श्रेय त्याची पत्नी दीपिका पदुकोणाला दिले आहे. रणवीरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय ज्यात त्याचा साईड फेस दिसत आहे. या फोटोत त्याने आपल्या केसांचा बुचडा बांधल्याचे दिसत आहे.
रणवीर या फोटोत कॅमेऱ्याकडे न पाहता दुसरीकडेच पाहताना दिसतो. या हेअरस्टाईलचे श्रेय त्याने दीपिकाला दिलंय. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ''मला हे आवडलं तुम्हाला कसे वाटतंय?'' रणवीरच्या चाहत्यांना त्याचा हा लूक खूप आवडला आहे. त्याच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडलाय.
कामाच्या पातळीवर रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी "83" या चित्रपटात कपील देवची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल रोजी रिलीज होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे याचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे. या चित्रपटात रणवीरसोबत दीपिका पदुकोणचीही छोटीशी भूमिका आहे.