मुंबई- १६ वर्षांपूर्वी या दिवशी अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका असलेला संजय लीला भन्साळी यांचा 'ब्लॅक' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील राणीने साकारलेली भूमिका तिच्या आयुष्यातील आजवरची सर्वात आव्हानात्मक भूमिका होती. मात्र ही भूमिका करण्यास सुरुवातीला ती नाखूष होती, असे सांगून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
"संजयने मला भूमिकेची ऑफर दिली तेव्हा सुरुवातीला मी चित्रपट करण्यास नाखूष होते. मला या चित्रपटाविषयी किंवा त्यातील भूमिकेबद्दल काही शंका होती त्यामुळे नाही, कारण भन्साळीसोबत काम करणे कोणत्याही अभिनेत्याचे स्वप्न असते," असे राणी म्हणाली.
'ब्लॅक'मध्ये अंध आणि बहिऱ्याची मुलीची आव्हानात्मक भूमिका
राणीने या चित्रपटात जन्मताच अंध आणि बहिऱ्या मुलीची भूमिका साकारली होती. यात तिची शिक्षकासाोबत असलेल्या घट्ट नात्याची ही कथा होती. शिक्षकाची भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली होती.
ही भूमिका झेपेल का याबद्दल राणीला होती शंका
"देवदास 'पाहिल्यानंतर मी संजय लीला भन्साळी यांच्या कामाची पूर्वीपासूनच एक प्रचंड फॅन होते. त्यामुळे भन्साळींबरोबर काम करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट होती. असे असले तरी एक अभिनेत्री म्हणून मला सक्षम असा विश्वास नव्हता. याबद्दल मी संजयसोबत चर्चा केली आणि विचारले, मला ही भूमिका तुम्ही देताय साबद्दल तुम्ही ठाम आहात काय? मला वाटते की ही भूमिका फारच अवघड आहे, ज्याची मी कधी आयुष्यात कल्पनाही केलेली नाही.'', असे राणी म्हणाली.
सुरुवातीला राणी घाबरली होती पण तिच्यावर संपूर्णपणे भन्साळींचा विश्वास होता ज्यामुळे तिला "ब्लॅक" बनविण्यात मदत झाली.
भन्साळींच्या विश्वासामुळेच राणीने स्वाकारली भूमिका
जेव्हा त्यांनी मला विश्वास दिला की ही भूमिका मी करू शकेन आणि त्यानंतर प्रत्येक पायरीवर त्यांनी मला मार्गदर्शन केले. याचा फायदा मला मिशेल मॅक्नाली साकारताना झाला, असेही राणीने संगितले.