मुंबई- हृतिक आणि कंगनाचा वाद आता जग जाहीर झाला आहे. दोघेही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने एकमेकांवर ताशेरे ओढत असतात. अशात हृतिकचा 'सुपर ३०' आणि कंगनाचा 'मेंटल है क्या' हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे त्यांच्यातील वाद पुन्हा एकदा नव्याने सुरू झाला आहे.
तू तिची कितीही बदनामी कर, ती मुलाखतीतून सत्य समोर आणेल; हृतिक-कंगनाच्या वादात रंगोलीची उडी - hrithik roshan
चित्रपटाची रिलीज डेट निश्चित करणं ही कंगनाची जबाबदारी नसून तो निर्माती एकता कपूरचा निर्णय आहे. एकताने हृतिकसोबत यासंबंधी बातचीतही केली आहे. अशात एकतासमोर काहीही न बोलता हृतिक कंगनावर निशाणा साधत असल्याचे रंगोलीने म्हटले आहे.
या वादात आता कंगनाची बहिण रंगोलीने उडी घेतली आहे. चित्रपटाची रिलीज डेट निश्चित करणं ही कंगनाची जबाबदारी नसून तो निर्माती एकता कपूरचा निर्णय आहे. एकताने हृतिकसोबत यासंबंधी बातचीतही केली आहे. अशात एकतासमोर काहीही न बोलता हृतिक कंगनावर निशाणा साधत असल्याचे रंगोलीने म्हटले आहे.
इतकंच नव्हे तर तू आपल्या पीआरच्या माध्यमातून हवी तेवढी कंगनाची बदनामी कर. ती एकाच मुलाखतीतून तुझं सर्व सत्य बाहेर आणेल, असेही रंगोलीने म्हटले आहे. रंगोलीने आपल्या ट्विटमधून हृतिकवर निशाणा साधत त्याला सुधारण्याचा सल्लाही दिला आहे. अशात आता हृतिक तिच्या या ट्विटला काय उत्तर देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.