मुंबई- कंगनाची बहिण रंगोली चंडेल गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. प्रसिद्धी झोतात येण्यासाठी ती गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधताना दिसत आहे. नुकतचं तिनं तापसी पन्नूला सस्ती कॉपी म्हणत वाद ओढावून घेतला होता. यानंतर आता तिने दीपिकावरही निशाणा साधला आहे.
तापसीनंतर रंगोलीचा दीपिकावर निशाणा; म्हणाली, प्रसिद्धीसाठी काहीही करते - depration video
द लिव लव लाफ फाउंडेशच्या एका मुलाखतीत दीपिकानं डिप्रेशनमध्ये असतानाच्या काही गोष्ट शेअर केल्या होत्या. या व्हिडिओला अनेकांनी पसंती दिल्यानंतर दीपिकाचा या फाऊंडेशनच्या महिलेसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला गेला होता. हाच डान्स व्हिडिओ शेअर करत रंगोलीनं दीपिकावर निशाणा साधला आहे.

हे काय चाललं आहे? असं डिप्रेशन असतं का? डिप्रेशनच्या व्हिडिओवर हे लोक वरातीत आल्याप्रमाणे नाचत आहेत. हा खूप घाणेरडा प्रकार आहे. डिप्रेशनच्या नावाखाली प्रसिद्धी मिळवण्याचा, असं रंगोलीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आता रंगोलीच्या या ट्विटवर दीपिका काय उत्तर देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.