मुंबई - बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेता-चित्रपट निर्माता रणधीर कपूर यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक डॉ. संतोष शेट्टी म्हणाले, "ज्येष्ठ अभिनेता रणधीर कपूर यांना काल रात्री कोविड -१९ उपचारासाठी मुंबईत कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल केले गेले. त्यांची प्रकृती स्थिर आहे."