मुंबई -प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी गेल्या फेब्रवारी महिन्यात नव्या पाहुण्याचे आगमन झाले होते. करिनाने मुलाला जन्म दिला. चाहते मुलाची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण आतूर आहेत. मात्र, करिना आणि सैफने मुलाच्या जन्मानंतर त्याचा फोटो हौशी फोटोग्राफर्सना घेऊ दिला नव्हता. तसेच त्याला लाईमलाईटपासून दूर ठेवले होते. तसेच सैफ आणि करीना दुसऱ्या मुलाचे नाव काय ठेवणार याबद्दल चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून करिना कपूरच्या मुलाचे नाव समोर आले आहे. याबाबत करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी माहिती दिली आहे. करिनाच्या मुलाचे नाव 'जेह' असे ठेवले आहे.
तैमूरच्या धाकट्या भावाचं नाव ठरलं; करिना-सैफच्या दुसऱ्या मुलाचे 'हे' आहे नाव - करिना-सैफच्या दुसऱ्या मुलाचे जेह
प्रसिद्ध अभिनेत्री करिना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव समोर आले आहे. करिनाच्या मुलाचे नाव 'जेह' असे ठेवले आहे करिना आणि सैफच्या दुसऱया मुलाचा जन्म झाल्यापासून त्याच्या नावाबद्दल वेगवेगळ्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या.
करिना आणि सैफच्या दुसऱया मुलाचा जन्म झाल्यापासून त्याच्या नावाबद्दल वेगवेगळ्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. त्यांचे चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहेत. परंतु सैफ आणि करिनाने याबद्दल अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही. रणधीर कपूर यांनी मुलाचे नाव 'जेह' असल्याचे एका मुलाखतीत सांगितले. दरम्यान सैफच्या वडिलांच्या नावावरून दुसऱ्या मुलाचे नाव 'मंसूर' असे ठेवण्यात येणार होते, अशा चर्चा माध्यमात रंगल्या होत्या. सैफचे वडील मंसूर अली खान पतौडी हे प्रसिद्ध क्रिकेटर आणि पतौडी नवाब होते.
सैफ आणि करीनाचा तैमूर हा पहिला मुलगा झाला. त्याचा जन्म 20 डिसेंबर 2016 झाला होता. त्याचे नाव तैमूर ठेवण्यावरूनही खूप वाद निर्माण झाला होता. तेव्हा सैफ आणि करिनाला प्रचंड टिकेचा सामना करावा लागला होता. तैमुर हा हौशी फोटोग्राफर्सचा नेहमीच कौतुकाचा विषय राहिला आहे. तैमुर प्रमाणे दिसणाऱ्या बाहुल्यादेखील बाजारात उपलब्ध झाल्या होत्या.