मुंबई - दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटात अभिनेता रणदीप हुडा काम करतोय. या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले असून रणदीपने इम्तियाजसाठी एक संदेश दिला आहे.
''इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले. हायवे चित्रपटानंतर ५ वर्षांनी त्यांच्यासोबत काम करीत असताना नेहमी सारखाच अप्रतिम अनुभव होता. कामाचा आनंद अमर्याद होता. एक कलाकार आणि व्यक्ती म्हणून नव्याने स्वतःला शोधता आले. त्यांच्या टीमला भावी कार्यासाठी शुभेच्छ देतो.'', असे रणदीप हुडाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.