रणदीप हुडाने ‘राधे, युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाचे शूटिंग केलं पूर्ण - राधे युअर मोस्ट वाँटेड भाई’ या सिनेमाचं शूटिंग पूर्ण
रणदीप हुडाने ‘राधे युअर मोस्ट वाँटेड भाई’ या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केल्याचं आपल्या फॅन्सना सांगितलं आहे. त्याने सोशल मीडियावर दोन फोटो पोस्ट करुन ही माहिती दिलीय.
मुंबई- रणदीप हुडाने नुकताच त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. सोबतच ‘राधे युअर मोस्ट वाँटेड भाई’ या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केल्याचं देखील आपल्या फॅन्सना सांगितलं आहे. या सिनेमात रणदीप एका खास भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.
रणदीप हुडा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत नव्हता. कारण नुकतीच त्याच्या गुडघ्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर सहा महिन्यांचा लॉकडाऊन लागल्यामुळे त्याने आपल्या घरातच थांबून आराम केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या जोमाने त्याने राधेच्या शुटिंगला सुरूवात केली होती. या सिनेमाचं शुटिंग आता त्याने संपवलं असल्याचं त्याने स्वतःच जाहीर केलं आहे.