मुंबई- रणदीप हुड्डा आपल्या आगामी 'रात ऑन अ हाईवे'च्या चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे. या आगामी थ्रिलरमध्ये तो एका अशा अॅडव्हर्टाइझिंग प्रोफेशनलची भूमिका साकारणार आहे, जो आपल्या आयुष्यातील ४८ तासांआधी घडलेल्या घटना विसरतो. रात ऑन अ हाईवेचं दिग्दर्शन विवेक चौहान करत आहेत, तर मोहन नादार यांची निर्मिती असणार आहे.
रणदीप हुड्डाने केली 'रात ऑन द हाईवे'च्या चित्रीकरणाला सुरूवात - सारा अली खान
रणदीप वगळता या चित्रपटाची इतर स्टारकास्ट युनायटेड किंगडममधील असणार आहे. याचं बहुतेक चित्रीकरण हे रात्रीच्या वेळी केलं जाणार आहे. रणदीप हुड्डाचं शेड्यूल २४ दिवसांत पूर्ण होणार असल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे.
रणदीप वगळता या चित्रपटाची इतर स्टारकास्ट युनायटेड किंगडममधील असणार आहे. याचं बहुतेक चित्रीकरण हे रात्रीच्या वेळी केलं जाणार आहे. रणदीप हुड्डाचं शेड्यूल २४ दिवसांत पूर्ण होणार असल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे. हिंदी आणि इंग्रजीत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
नादार यांनी यातील रणदीपच्या पात्राविषयी म्हटलं, ही स्क्रीप्ट ऐकल्यानंतर हे पात्र रणदीप चांगल्या प्रकारे साकारू शकतो, असं आम्हाला वाटलं आणि रणदीपलाही स्क्रीप्ट आवडली. दरम्यान रणदीपनं नुकतंच इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. यात सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या मुख्य भूमिका आहेत.