महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रणबीर-श्रद्धाने लव रंजनच्या आगामी सिनेमाचं शूटिंग पुन्हा सुरू केले - लव रंजनच्या लग्नात श्रध्दा

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी मंगळवारपासून चित्रपट निर्माते लव रंजन यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. या चित्रपटाचे अद्याप शीर्षक ठरलेले नाही. गेल्या महिन्यात लव रंजनच्या लग्नामुळे रणबीर आणि श्रद्धाने छोट्या ब्रेकनंतर येथे शूटिंग सुरू केले. या चित्रपटाची शेवटची फक्त दोन शेड्यूल बाकी आहेत.

रणबीर-श्रद्धा
रणबीर-श्रद्धा

By

Published : Mar 9, 2022, 1:30 PM IST

मुंबई- अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी मंगळवारपासून चित्रपट निर्माते लव रंजन यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. या चित्रपटाचे अद्याप शीर्षक ठरलेले नाही. मुंबईत या चित्रपटाचे शुटिंग केले जाणार असून चित्रपटाचा बराचसा भाग शूट झाला आहे. शेवटची फक्त दोन शेड्यूल या सिनेमाची बाकी आहेत.

चित्रपटाच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात लव रंजनच्या लग्नामुळे रणबीर आणि श्रद्धाने छोट्या ब्रेकनंतर येथे शूटिंग सुरू केले. नवीन शेड्यलसाठी चित्रपटाची टीम फ्लोअरवर पोहोचली आहे. दिग्दर्शक लव रंजनच्या लग्नात रणबीर आणि श्रद्धाने धमाका केला होता. आता पुन्हा एकदा सर्वजण चित्रपट पूर्ण करण्याच्या कामाला परतले आहेत.

अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या भूमिका असलेला व अद्याप शीर्षक ठरलेले नसलेला चित्रपट 2023 च्या प्रजासत्ताक दिनी रिलीज होणार होता. आता हा चित्रपट ८ मार्च २०२३ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाची घोषणा डिसेंबर 2019 मध्ये करण्यात आली होती. तथापि, कोविड-19 महामारीमुळे शूटिंग आणि त्याचे रिलीज पुढे ढकलले गेले. हा चित्रपट कथितपणे एक रोमँटिक-कॉमेडी आहे, 'प्यार का पंचनामा' फ्रँचायझी आणि 'सोनू के टीटू की स्वीटी'साठी प्रसिद्ध असलेले लव रंजन याचे दिग्दर्शक आणि निर्माते आहेत.

2019 मध्ये जाहीर झालेल्या या चित्रपटाला यापूर्वी अनेकदा अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. लव रंजनच्या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदा एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे बोनी कपूर यात रणबीर कपूरच्या ऑन-स्क्रीन वडिलाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात डिंपल कपाडियाचीही भूमिका असेल.

हेही वाचा -ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट 'शर्माजी नमकीन' होणार ओटीटीवर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details