मुंबई - अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट विवाहित होणार अशी चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. यावर रणबीर अजूनपर्यंत मौन बाळगून होता. मात्र त्याने लग्नाबाबतचे मौन सोडले असून या चर्चेत तथ्य असल्याचे म्हटले आहे.
रणबीर आणि आलियाचे चाहते ते कधी बोहल्यावर चढतात हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. एका वेबलोइडला दिलेल्या मुलाखतीत आलियाने लग्नाविषयी विचारले असता म्हणाली की, ''मी लग्न कधी करणार? प्रत्येकजण मला लग्न कधी करणार असे का विचारत आहे?तुम्हाला माहितीय की मी २५ वर्षांची आहे आणि मला वाटते की आता लग्न करणे हे खूप लवकर होईल."
असे असले तरी रणबीरने आलिया भट्टबरोबर त्याच्या लग्नाच्या अफवा खऱ्या अर्थाने स्वीकारल्या आहेत. जर जगभरात कोरोना साथीची परिस्थिती नसती तर दोघेही लग्न केलेले जोडपे ठरले असते.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरने आपल्या लग्नाच्या अफवांबद्दल बोलताना सांगितले की, "मी काहीही बोलून याला टाळू इच्छित नाही. माझ्या आयुष्यात मी हे ध्येय लवकरच गाठणार आहे.'' मुलाखत व्हायरल होत असून रणबीरने यात पहिल्यांदाच आलियाला आपली गर्लफ्रेंड म्हटले आहे.