रणबीर कपूरला कोरोनाची बाधा, आईने दिला बातमीला दुजोरा - रणबीर कपूर सेल्फ क्वारंटाईन
अभिनेता रणबीर कपूरला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यानंतर तो सेल्फ क्वारंटाईन झाला असून त्याची तब्येत बरी असल्याचे त्याची आई नीतू कपूर यांनी सांगितले आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून त्यांनी रणबीरची चौकशी करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
मुंबई - गेल्या वर्षी जगभरात आणि साहजिकच भारतात पोहोचलेल्या कोरोना विषाणूने हाहाकार माजविला होता. लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंग, मास्क्स, सॅनिटायझर इत्यादीच्या साहाय्याने या खतरनाक विषाणूचा मुकाबला केला गेला व अजूनही केला जातोय. हा विषाणू देश-परदेश, स्त्री-पुरुष, वयाने छोटे-मोठे, गरीब-श्रीमंत असा भेदभाव अजिबात करीत नाही. आपल्या देशांतही सामान्य जनांबरोबरच कोरोना ने उच्चभ्रू लोकांनाही पकडले आणि त्यात अनेक सेलिब्रिटीज आणि फिल्मस्टार्स चा अंतर्भाव आहे. कोरोना सोबतच्या पाठशिवणीत भले भले पकडले गेलेत व आता तरुण सुपरस्टार रणबीर कपूरला ही कोरोनाने पकडले आहे. त्याचे काका रणधीर कपूर यांनी ‘तो आजारी आहे’ अशी मोघम माहिती दिली असली तरी रणबीर कपूरची आई नीतू (सिंग) कपूरने समाज माध्यमांवर आपल्या मुलाला कोरोना झाल्याचे पोस्ट केले.
कोरोनाच्या विळख्यात अनेक राजकारणी, सेलिब्रिटीज आणि छोट्या-मोठ्या पडद्यावरील कलाकार अडकले. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, किरण कुमार, अर्जुन कपूर, वरुण धवन, तमन्ना भाटिया, आफताब शिवदासानी, जेनेलिया देशमुख, दीप्ती नवल सारा खान, पार्थ समथान, हिमांश कोहली, राजेश्वरी सचदेव, हर्षवर्धन राणे अशा अनेक फिल्म स्टार्स व टीव्ही स्टार्स ना कोरोना ने पकडले होते व हे त्या सर्वांनी त्या विषाणूशी यशस्वी लढा दिला. आता रणबीर कपूरचा नंबर लागला असून तोही कोरोनाशी समर्थपणे मुकाबला करेल हे नक्की.
खरंतर मनोरानसृष्टीत भलेही काम सुरु झाले असो परंतु प्रत्येक सेटवर सर्वांचीच सर्वाधिक काळजी घेतली जाते, खासकरून फिल्मस्टार्सची. तरीही या स्टार्स ना कोरोना होतो ही सामान्यजनांसाठी चिंतेची बाब आहे. काही दिवसांपूर्वी नीतू कपूर यांनाही कोरोना झाला होता. त्यावेळी त्या जयपूरमध्ये ‘जुग जुग जियो’ चे शूटिंग करीत होत्या. रणबीरने चार्टर फ्लाईटने जाऊन आपल्या आईला उपचारांसाठी मुंबईला आणले होते. त्या बऱ्या झाल्यावर पुन्हा जयपूरला पोहोचल्या आपले चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी.
समाज माध्यमावर नीतू कपूर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत, रणबीरच्या तब्येतीच्या चौकशीबद्दल. रणबीर स्व-विलगीकरणात असून औषधोपचार सुरु आहेत. त्याची तब्येत सुधारणा दाखवीत असून तो सावधगिरी व दक्षता बाळगत आहे. सर्वांचे आभार.
हेही वाचा - श्रध्दा कपूरने 'सायना' चित्रपट का सोडला? या प्रश्नाला अमोल गुप्तेने दिली बगल