महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्त बहिण रिद्धिमाने दिल्या खास शुभेच्छा!! - Ridhima Kapoor latest news

रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनीने सोशल मीडियावरुन आपल्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक खास कोलाज तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Ranbir Kapoor turns 38,
रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर

By

Published : Sep 28, 2020, 1:01 PM IST

मुंबई - रिद्धिमा कपूर साहनीने आपला लहान भाऊ आणि बॉलिवूडचा अभिनेता रणबीर कपूर याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत. रणबीरचा आज ३८वा वाढदिवस साजरा करीत आहे.

रिद्धिमाने तिच्या भावासाठी एक खास कोलाज इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. रणबीरच्या वाढदिवसा निमित्त त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

रिद्धिमाने शेअर केलेल्या कोलाजमध्ये भावा-बहिणींचे सुंदर फोटो दिसत आहेत. या फोटोमध्ये वडील ऋषी कपूर यांचाही एक फोटो आहे. या फोटोला तिने एक कॅप्शन देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रिद्धिमाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरही वाढदिवसानिमित्त काही फोटो शेअर केले आहेत.

आज ३८वा वाढदिवस साजरा करीत असलेला लोकप्रिय अभिनेता रणबीर ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये आलिया भट्टसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे, ज्यात मेगास्टार अमिताभ बच्चन देखील आहेत. त्याच्याकडे शमशेर आणि लव्ह रंजन हे दोन चित्रपटही आहेत.

राजकुमार हिरानीच्या संजू चित्रपटामध्ये रणबीर कपूर दिसला होता. त्यानंतर त्याचा चित्रपट झळकलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details