महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आलियाला डेट करत असतानाही कॅटरिना, दीपिकाला फॉलो करतो रणबीर - katrina kaif

रणबीर सुरूवातीला अभिनेत्री कॅटरिना कैफला डेट करत होता. ७ वर्ष हे दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, २०१६ मध्ये त्यांनी ब्रेकअप केलं. यामागचं नेमकं कारण अद्यापही दोघांनी उघड केलं नाही.

कॅटरिना आणि दीपिकाला फॉलो करतो रणबीर

By

Published : May 26, 2019, 3:29 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर चित्रपटांपेक्षाही आपल्या रिलेशनशिपमुळेच अधिक चर्चेत असतो. बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींना डेट करणारा रणबीर सध्या आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, असे असतानाही तो अजूनही कॅटरिना आणि दीपिकाला इन्सटाग्रामवर फॉलो करतो. एका कार्यक्रमात हजेरी लावली असता रणबीरने स्वतः याबद्दल खुलासा केला. हे सर्वांनाच माहिती आहे, की रणबीर सुरूवातीला अभिनेत्री कॅटरिना कैफला डेट करत होता. ७ वर्षे हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, २०१६ मध्ये त्यांनी ब्रेकअप केलं. यामागचं नेमकं कारण अद्यापही दोघांनी उघड केलेलं नाही. यानंतर रणबीर दीपिकासोबत रिलेशनशिपमध्ये होता. काही काळातच या दोघांच्या नात्यालाही पूर्णविराम लागला. ज्यानंतर अनेक दिवस दीपिका डिप्रेशनमध्ये होती. सध्या रणबीर आलिया भट्टला डेट करतोय. मात्र, असे असतानाही आपल्या दोन्ही एक्स गर्लफ्रेंडला तो फॉलो करत असल्याचे रणबीरने स्वतःच उघड केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details