महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रणबीर आणि आलियाचे डिसेंबरमध्ये लग्न?

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या बॉलिवूडमध्ये स्विट कपलला काही दिवसांपूर्वी जोधपूरमध्ये हॉटस्पॉट करण्यात आले. त्याचे फोटोही व्हायरल झाले आणि यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. ते लग्नासाठी हॉल पाहायला तिथे गेले असतील, असा कयास काढला जात होता. २७ सप्टेंबरला रणबीरचा वाढदिवस आहे. त्यामुळे ते वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले असतील, याचीही शक्यता नाकारता येत नव्हती. दरम्यान, यापूर्वीही ते नवीन वर्ष साजरे करण्यासाठी जयपूरला गेले होते. तेव्हाही त्यांच्या लग्नाबाबतच्या चर्चांना उधाण आले होते.

रणबीर आणि आलिया
रणबीर आणि आलिया

By

Published : Oct 27, 2021, 6:29 PM IST

मुंबई- रुमर कपल रणबीर कपूर आणि आलिया भट येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे वृत्त एक वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. दोघे बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता डिसेंबरचे वृत्त खरे आहे की नाही याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या बॉलिवूडमध्ये स्विट कपलला काही दिवसांपूर्वी जोधपूरमध्ये हॉटस्पॉट करण्यात आले. त्याचे फोटोही व्हायरल झाले आणि यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. ते लग्नासाठी हॉल पाहायला तिथे गेले असतील, असा कयास काढला जात होता. २७ सप्टेंबरला रणबीरचा वाढदिवस आहे. त्यामुळे ते वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले असतील, याचीही शक्यता नाकारता येत नव्हती. दरम्यान, यापूर्वीही ते नवीन वर्ष साजरे करण्यासाठी जयपूरला गेले होते. तेव्हाही त्यांच्या लग्नाबाबतच्या चर्चांना उधाण आले होते.

यापूर्वीही रंगल्या चर्चा

2021 च्या नवीन वर्षाच्या निमित्ताने आलिया आणि रणबीर त्यांच्या कुटुंबीयांसह जयपूरला गेले होते. त्यावेळीही असे म्हटले गेले की ते लग्नाचे ठिकाण निश्चित करण्यासाठी आले होते. मात्र त्या चर्चा निष्फळ ठरल्या. कारण ते तिथे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गेले होते.

दोघेही कामात व्यस्त

आलिया आगामी 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'आरआरआर' चित्रपटात दिसणार आहे. तर दुसरीकडे, रणबीरकडे 'शमशेरा' आणि 'अॅनिमल' सारखे मोठे चित्रपट आहेत. दोघेही 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यशराज फिल्म्सने घोषणा केली की मुंबईत सिनेमा हॉल सुरू झाल्यावर 'शमशेरा' 18 मार्च 2022 रोजी रिलीज होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details