मुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असणारं कपल रणबीर आणि आलिया लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून पुढील चित्रीकरणासाठी रणबीर आणि आलिया उत्तर प्रदेशमधील वाराणसीत दाखल झाले आहेत.
Photo: 'ब्रह्मास्त्र'च्या शूटींगसाठी रणबीर-आलिया वाराणसीत, पांढऱ्या कुर्तीत ग्लॅमरस दिसतीये अलिया - glamour look
वाराणसीतील रामनगर आणि चेट सिंग या किल्ल्यांमध्ये २० दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. रणबीर आणि आलियाचे वाराणसीतील एका किल्ल्यातील फोटो आता समोर आले आहेत.
वाराणसीतील रामनगर आणि चेट सिंग या किल्ल्यांमध्ये २० दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. रणबीर आणि आलियाचे वाराणसीतील एका किल्ल्यातील फोटो आता समोर आले आहेत. या फोटोत आलिया पांढऱ्या रंगाच्या कुर्तीमध्ये दिसत आहे. तिचा हा साधा पण ग्लॅमरस लूक प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
अयान मुखर्जीद्वारा दिग्दर्शित हा बहुचर्चित चित्रपट २०२० च्या उन्हाळ्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात आलिया आणि रणबीरशिवाय अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अयान मुखर्जी यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून ही कथा लिहिण्यासाठी त्यांना तब्बल ५ वर्षे लागले होते.