हैदराबाद: बॉलिवूडचे लव्हबर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी पंधरवड्याआधीच नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे. आज दोघांनाही गोव्याला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले.
लॉकडाउन संपल्यानंतर आलिया तिच्या बिझी कामासाठी परतली होती. ती अभिनेता संजय लीला भन्साळी यांच्या आगामी गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचे मुंबईत शूटिंग करत होती आणि गेल्या आठवड्यात तिने हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये एस.एस. राजामौलीच्या महत्वाकांक्षी चित्रपट 'आरआरआर'साठी शूटिंगदेखील केले. दरम्यान, रणबीर अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र'साठी डबिंग करत होता आणि श्रद्धा कपूरसोबत लव्ह रंजनच्या आगामी चित्रपटाची तयारी करत होता.