मुंबई- देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन अशी ओळख असलेल्या लडाखला नुकतंच केंद्रशासित घोषित करण्यात आले आहे. यानंतर मोदींनी लडाखमध्ये फिल्म इंडस्ट्रीने शूटींग करण्याचे आवाहन केले होते. आता लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर लडाखमध्ये चित्रीत केला जाणारा शमशेरा हा पहिलाच सिनेमा ठरणार आहे.
'शमशेरा'च्या चित्रीकरणासाठी रणबीर-वाणी निघाले लडाखला
लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर लडाखमध्ये चित्रीत केला जाणारा शमशेरा हा पहिलाच सिनेमा ठरणार आहे.या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी रणबीर कपूर आणि वाणी कपूर लडाखला निघाले आहेत
या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी रणबीर कपूर आणि वाणी कपूर लडाखला निघाले आहेत. आपला हा चित्रपट उत्तम बनवण्यात दिग्दर्शक करण मल्होत्राला कोणतीही कसर सोडायची नाही. या चित्रपटात संजय दत्तदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. संजय यात खलनायकाची भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटाची कथा ही स्वतंत्र्यपूर्व काळातली आहे. आपल्या हक्कांसाठी ब्रिटीशांविरुद्ध लढणाऱ्या डाकूची कहाणी या चित्रपटात दाखवली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. हा सिनेमा २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.