मुंबई - प्रेक्षकांना चित्रपटांतून नवीन जोड्या बघायला आवडतात. चित्रपट निर्माते दिग्दर्शक सुद्धा वेगवेगळ्या लोकप्रिय हिरो-हिरॉइन्सना एकत्र आणण्यासाठी शक्कल लढवत असतात. जेव्हा दिग्दर्शक लव्ह रंजन यांनी रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांना आपल्या चित्रपटासाठी घेतलं तेव्हाच त्या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली होती. नुकतेच लव्ह फिल्म्सने घोषित केले की त्यांचा आगामी चित्रपट, रणबीर व श्रद्धा अभिनित, पुढील वर्षी होळीला प्रदर्शित होणार आहे. २०२२ च्या १८ मार्चला, अद्याप अशीर्षकांकित, हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे चित्रीकरण जोरात सुरु आहे.
रणबीर कपूर, श्रद्धा कपूर आणि लव्ह रंजन यांनी पकडलाय २०२२ च्या होळीचा मुहूर्त ! - रणबीर कपूर, श्रद्धा कपूर पहिल्यांदाच एकत्र येणार
लव्ह फिल्म्सने घोषित केले की त्यांचा आगामी रणबीर आणि श्रध्दा कपूर यांच्या भूमिका असलेला चित्रपट पुढील वर्षी होळीला रिलीज होणार आहे. अद्याप शीर्षक न ठरलेला हा चित्रपट १८ मार्च २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
रणबीर कपूर, श्रद्धा कपूर