महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कोणामुळे पहाटे ५. ४५ला रेडिओ स्टेशनला पोहोचला राणा दग्गुबाती? - अक्षय कुमारची रोजची जीवनशैली

अक्षय कुमारच्या रोजची जीवनशैली सहकलाकारांना नेहमी आचंबित करीत असते. तो नेहमी लवकर तर उठतोच पण इतरांनीही लवकर उठावे असा त्याचा आग्रह असतो. अभिनेता राणा दग्गुबातीला आलेला अनुभव खूपच वेगळा आहे. एकदा त्याला अक्षय कुमार ५.४५वाजता रेडिओ शोवर घेऊन गेला होता.

Akshay Kumar, Rana Daggubati
अक्षय कुमार,राणा दग्गुबाती

By

Published : Oct 7, 2020, 4:47 PM IST

Updated : Oct 7, 2020, 6:29 PM IST

मुंबई - सुपरस्टार अक्षय कुमारला नेहमी पहाटे उठण्याची सवय आहे आणि आपल्या सहकलाकाराने आपल्या आयुष्यात या दिनचर्येचा उपयोग करावा असे त्याला मनापासून वाटते. अक्षयसोबत 'बेबी' आणि 'हाऊसफुल 4' मध्ये काम केलेल्या राणा दग्गुबाती याला अक्षयच्या या दिनचर्येचा किस्सा आठवला. अक्षयमुळे जेव्हा राणा दग्गुबातीला पहाटे ५.४५वाजता रेडिओ मुलाखतीसाठी जाणे भाग पडले होते.

राणा म्हणाला, ''मी मुंबईत येऊन अक्षय कुमारसोबत काम केले आहे. त्याची विचारधारा मुंबईपेक्षा वेगळी आहे. मी माझे अर्धे आयुष्य मुंबईत घालवले असून अक्षयसोबतही राहिलो आहे. मी अक्षयसोबत 'बेबी' आणि 'हाऊसफुल 4' सारखे चित्रपट केले आहेत. तो मला ५.४५वाजता रेडिओ शोवर घेऊन गेला होता.''

बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार एकमेव असा स्टार आहे, जो आपली जीवनशैली, खाणे पिणे आणि फिटनेससाठी खूप ओळखला जातो. त्याची जीवनशैली त्याच्या सहकाऱ्यांना नेहमीच आचंबित करीत असते.

Last Updated : Oct 7, 2020, 6:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details