मुंबई - सध्या सुरु असलेल्या ऐतिहासिक, पौराणिक आणि बायोपिक चित्रपट बनविण्याच्या ट्रेंडमध्ये ‘रामायण’ हा महत्वकांक्षी चित्रपटही मोडतोय. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटातील ‘कास्टिंग’बद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहेत. यातील मुख्य पात्रांसाठी अनेक नावं ‘फिरत’ होती परंतु सध्या एक नाव वेगळ्या तऱ्हेने गाजतंय ते म्हणजे करीना कपूर खान. करीनाला ‘रामायण’ या चित्रपटासाठी ‘सीता’ साकारण्यासाठी विचारण्यात आल्याचं सगळीकडेच जाहीर झालंय. परंतु काही दिवसांपूर्वी तिने या चित्रपटासाठी मानधन दुपट्ट केल्याची चर्चा होती. ढोबळ मानाने, अनधिकृतपणे, असे बोलले जाते, की करीना एका चित्रपटातही ६ ते ७ कोटी रुपये घेते. परंतु ‘रामायण’ चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी तिने तब्बल १२ कोटी मागितल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत फिरत आहे.
#BoycottKareenaKhan करीना कपूर खानला ‘सीता’ साकारण्यासाठी निवडू नका, नेटिझन्स संतप्त! - रामायण चित्रपट लेटेस्ट न्यूज
काही लोकांनी करीनाला कास्ट करण्याची योजना केल्याबद्दल या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर बहिष्कार घालण्यची मागणी केली आहे. ‘फ्रीडम ऑफ एक्सपेशन’ आणि ‘फ्रीडम ऑफ स्पीच’ यावरूनही करीनाच्या बाजूने आणि विरुद्ध ट्विट-खडाजंगी सुरु आहे.
नेटकऱ्यांचा संताप
या वृत्तानंतर ट्विटरवरील नेटिझन्स संतप्त झाले आहेत. अभिनेता करीना कपूर खानच्या बहिष्कारची मागणी करत #BoycottKareenaKhan हा ट्रेंड सुरु झाला आहे. अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया देत याला पाठिंबा दर्शविला असून तिच्या धर्मावरूनही बरेच काही बोलले जातेय. हिंदू करीना कपूरने मुसलमान सैफ अली खानसोबत विवाह केलाय आणि तिला दोन अपत्ये आहेत. कुठलीही व्यक्ती जर का मुसलमानांशी लग्न करीत असेल तर तिला मुस्लिम धर्म स्वीकारणे बाध्यात्मक असते आणि त्यामुळे करीना आता मुस्लिम धर्मीय असून तिने हिंदूंच्या हृदयाच्या जवळील सीता पडद्यावर साकारणे अतार्किक, अशोभनीय आहे असा मतप्रवाह आहे. हिंदू देवीदेवतांची भूमिका साकारायला हिंदू अभिनेत्री वा अभिनेताच निवडावा असा आग्रह नेटकऱ्यांनी धरलाय. त्यातच करीना दोन मुलांची आई असल्यामुळेही तिला ही भूमिका करण्याचा अधिकार नाही असेही बोलले जातेय. तसेच तिने आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यामुळेही वादंग निर्माण झाला होता.
मानधनात वाढ
काही लोकांनी करीनाला कास्ट करण्याची योजना केल्याबद्दल या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर बहिष्कार घालण्यची मागणी केली आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्यानेही असे नमूद केलंय की करिनाचा अभिनेता-पती सैफ अली खान याने ‘तांडव’ या वेब सिरीजमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आणि आता करीनाही त्याचीच पुनरावृत्ती करीत आहे. ‘फ्रीडम ऑफ एक्सपेशन’ आणि ‘फ्रीडम ऑफ स्पीच’ यावरूनही करीनाच्या बाजूने आणि विरुद्ध ट्विट-खडाजंगी सुरु आहे. सूत्रांकडून असेही कळते की करीना एखाद्या चित्रपटाला दीड-दोन महिने देते परंतु ‘रामायण’ साठी तिला तब्बल नऊ महिने शूटिंग करावे लागणार असल्यामुळे तिने आपल्या मानधनात वाढ करून मागितली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या संशयास्पद निधनानंतर जेव्हा #BoycottStarKids ट्रेंड होत होता तेव्हा तेव्हा करीनाने प्रेक्षकांनाच दोषी धरत घमंडीपणे म्हटले होते की ‘तुम्हीच आमचे चित्रपट बघता. तुम्हीच आम्हाला स्टार बनवता. पाहिजे तर तुम्ही माझे पिक्चर्स बघू नका’. #BoycottKareenaKhan, १.१७+ लाख ट्वीटसह, भारतात प्रथम क्रमांकावर आहे.