हैदराबाद - प्रसिध्द दिग्दर्शक राम गोपाल वर्माने आपल्या आगामी दिशा या चित्रपटाची घोषणा केली आहे. अलिकडेच पशुचिकीत्सक असलेल्या दिशा या पीडितेचा हैदराबादच्या बाहेर बलात्कार करुन खून करण्यात आला होता. याच विषयावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी राम गेपाल वर्मा यांनी शमशाबादचे पोलीस कमिश्नर यांची भेट घेतली आहे.
वर्माने भेटीनंतर सांगितले, सिनेमाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठीचा ही भेट होती. घटना कशी घडली याबद्दल तपशीलात स्क्रिप्टमध्ये मांडणी करण्यासाठी हे आवश्यक होते.
यापूर्वीही या सिनेमाबद्दल रिसर्च करीत असल्याच्या प्रक्रियेबद्दल सोशल मीडियावर रामूने माहिती दिली आहे.
हेही वाचा - BIG BREAKING : हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर
दिशा सिनेमाची घोषणा करताना रामूने लिहिले होते, ''माझ्या पुढील चित्रपटाचे शीर्षक दिशा आहे. किळसवाण्या निर्भया रेप केसनंतर झालेल्या दिशा रेपच्याबद्दल हा चित्रपट आहे. बिचाऱ्या मुलीला पेट्रोल टाकून जाळणाऱ्या बलात्काऱ्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आणि स्वतः रॉकेलमध्ये जळून मेले.
# दिशा निर्भयाची सच्चाई.''
आणि तेलुगु भाषेत राम गोपाल वर्मा यांनी अनेक उत्तमोत्तम सिनेमे बनवले आहेत. हॉररर, क्राईम थ्रिलर बनवण्याचा त्याचा हातखंडा आहे. 'सरकार ३' हा त्याने बनवलेला शेवटचा चित्रपट होता. यात अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका केली होती.
आरजीव्हीचे 'सत्या', 'भूत', 'कंपनी', 'कौन?', 'अब तक छप्पन', 'द अटॅक्स ऑफ 26/11', 'रक्त चरित्र', 'राम गोपाल वर्मा की आग', 'रण', 'डरना जरूरी है', 'निशब्द', 'वीरप्पन' आणि 'फूंक' असे असंख्या चित्रपट गाजले आहेत.