मुंबई- कलाविश्वात गायिका कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला होता. जगभरात या कोरोना विषाणूने थैमान घातले असताना आपल्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर कला विश्वात खळबळ उडाली होती.
राम गोपाल वर्मा यांना कोरोनाची लागण? ट्विटने उडवली खळबळ
जगभरात या कोरोना विषाणूने थैमान घातले असताना आपल्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केले होते.
राम गोपाल वर्मा यांना कोरोनाची लागण? ट्विटने उडवली खळबळ
राम गोपाल वर्मा यांनी 1 एप्रिल रोजी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले होते. मात्र काही वेळानंतर त्यांनी पुन्हा एकदा एक ट्विट करून डॉक्टरांनी आपल्याला एप्रिल फुल बनवलं असं सांगितलं.
त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडिया ते चांगलेच ट्रोल झाले. अशा कठीण परिस्थितीत असं धक्कादायक ट्विट केल्यामुळे त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.