महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

राम गोपाल वर्माच्या ‘डी कंपनी’चा टीजर प्रदर्शित - rgv releases teaser of D Company

आरजीव्हीचा ‘कंपनी’ चित्रपट इकडूनतिकडून जमविलेल्या माहितीवर बनविला गेला होता. परंतु ‘डी कंपनी’ मात्र दाऊदच्या देशी व सीमेपलीकडील निकटच्या साथीदारांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीवर आधारित आहे.

Ram Gopal Varma releases teaser of D Company
राम गोपाल वर्माच्या ‘डी कंपनी’चा टीजर प्रदर्शित

By

Published : Jan 23, 2021, 7:23 PM IST

मुंबई - २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कंपनी’ नंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आता नवीन ‘डी कंपनी' नावाचा नवीन चित्रपट घेऊन येत आहे. हा चित्रपट दाऊद इब्राहिम कासकर याच्या मुंबईतील डी कंपनीवर आधारित आहे. ॲक्शन-थ्रिलर व राजकीय नाट्य उभे करण्यासाठी प्रसिद्ध असलेला राम गोपाल वर्मा म्हणजेच आरजीव्हीने या चित्रपटाचे टिझर नुकतेच समाज माध्यमांवर प्रदर्शित केले. वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध असलेला आरजीव्हीच्या मते दाऊदकडेसुद्धा जगातील सुप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स प्रमाणेच व्यावसायिक दूरदृष्टी होती. म्हणूनच मुंबईतील एका छोट्याश्या गल्लीत सुरु झालेली ‘स्ट्रीट गॅंग’ आज इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे.

राम गोपाल वर्मा
आरजीव्हीचा ‘कंपनी’ चित्रपट इकडूनतिकडून जमविलेल्या माहितीवर बनविला गेला होता. परंतु ‘डी कंपनी’ मात्र दाऊदच्या देशी व सीमेपलीकडील निकटच्या साथीदारांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीवर आधारित आहे. गेल्या दोन दशकांवर आंतरराष्ट्रीय न्यूजमध्ये राहणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या द्रष्टेपणावर हा सिनेमा भाष्य करेल, असे दिग्दर्शकाचे म्हणणे आहे. १९९३च्या मुंबई बॉम्ब हल्ल्यांमध्ये दाऊदचाच हात होता असा त्याच्यावर ठपका असून अमेरिकेच्या एफबीआयनुसार जगातील घोषित फरार लिस्टमध्ये त्याचा तिसरा क्रमांक आहे. दाऊदसोबत राहिलेल्या, जगलेल्या व मृत्यू पावलेल्या इतर गॅंगस्टर्सवरही हा चित्रपट प्रकाश टाकेल.‘स्पार्क’ निर्मित व राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘डी कंपनी’ हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे वितरण यूएफओ मूव्हीज इंडिया लि. करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details