मुंबई - बॉलिवूड स्टार रकुल प्रीत सिंह रॉनी स्क्रूवालाच्या आगामी चित्रपटाला होकार दिला असून तिने करारावर सही केली आहे. या चित्रपटा रकुल एका कंडोम परीक्षकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
रिपोर्टनुसार मराठी दिग्दर्शक तेजस विजय देवस्कर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनी माधुरी दीक्षितच्या २०१८ मध्ये रिलीज झालेल्या बकेट लिस्ट चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. याबाबत अधिक तपशील देण्यात आलेला नसला तरी या चित्रपटाचे शीर्षक निश्चित झाले असल्याचे समजते.
या चित्रपटाचे शीर्षक छत्रीवाली असू शकते. कंडोमच्या वापराबद्दलचा संदेश देणारा विषय यात हाताळण्यात येणार आहे. हा विषय धाडसी असला तरी निर्मात्यांनी विनोदी पध्दतीने संदेश देण्याची योजना आखली आहे. रकुलने चित्रपटात सही केल्याच्या बातमीनंतर लगेचच रकुल ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती अशा बातम्या झळकल्या आहेत. यापूर्वी अनन्या पांडे आणि सारा अली खानला या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. त्यांनी नकार दिल्यामुळे रकुलचा या भूमिकेसाठी विचार झाला आहे.
हेही वाचा - डॉक्टर जी’मध्ये रकुल प्रीत सिंग असणार आहे आयुष्मान खुरानाची ‘सिनियर’!