मुंबई- राजपाल यादव हा बॉलिवूडमधील अत्यंत हरहुन्नरी अभिनेता आहे. त्याने आज आपल्या चमकदार अभिनयाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत नेहमीच रंजक आणि आव्हानात्मक भूमिका केल्या आहेत. आपल्या जबरदस्त अभिनय आणि कॉमेडीमुळे तो बर्याच वर्षांपासून प्रेक्षकांचे सतत मनोरंजन करत आहे. अशा या राजपालने एक मोठा खुलासा केला आहे. राजपाल यादव म्हणतो की, त्याने आपले नाव बदलले आहे.
राजपाल यादव याने एका मुलाखती दरम्यान सांगितले की आपले नाव बदलणार आहे. त्याने आपल्या नावात वडिलांचे नाव जोडले आहे. यापुढे तो आपले नाव राजपाल नौरंग यादव या नावाने ओळखला जाईल. याबद्दल बोलताना तो म्हणाला, 'माझ्या वडिलांचे नाव माझ्या पासपोर्टमध्ये नेहमीच राहिले आहे, फक्त एकच गोष्ट आहे की आता ते पडद्यावरदेखील दिसेल.