महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

राजपाल यादव करणार काँग्रेसमध्ये प्रवेश? शीला दीक्षितांच्या निवासस्थानी दाखल - Sheila Dikshit

राजपाल यादव दिल्लीत जाऊन शीला दीक्षित यांची भेट घेत असल्याने तो काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे

राजपाल यादव करणार काँग्रेसमध्ये प्रवेश?

By

Published : Apr 4, 2019, 1:03 PM IST

दिल्ली- लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार आपला मोर्चा राजकारणाकडे वळवताना दिसत आहेत. उर्मिला मातोंडकर, अमोल कोल्हे यांच्या पाठोपाठ आता अभिनेता राजपाल यादवही राजकारणाच्या वाटेवर आहे. नुकतंच राजपाल दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निवास्थानी दाखल झाला आहे.


राजपाल यादव दिल्लीत जाऊन शीला दीक्षित यांची भेट घेत असल्याने तो काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप तरी याबद्दल कोणतीही घोषणा झाली नसून लवकरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे म्हटले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details