महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

तेलुगु कॉप थ्रिलर 'एचआयटी'च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार राजकुमार राव

राजकुमार राव हा तेलुगु ड्रामा चित्रपट एचआयटीच्या हिंदी रिमेकसाठी तयार झाला आहे. मुळ तेलुगु चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश कोलानू यांनीच हिंदी रिमेकही बनवायचे ठरवले आहे. २०२१मध्ये हा चित्रपट शूटिंग फ्लोअरवर जाईल.

Rajkummar Rao
राजकुमार राव

By

Published : Jul 15, 2020, 12:38 PM IST

मुंबई - अभिनेता राजकुमार राव तेलुगु सुपरहिट कॉप थ्रिलर एचआयटीच्या हिंदी रिमेकमध्ये काम करणार आहे. हा चित्रपट एका महिलेचा शोध घेणाऱ्या होमिसाईड इंटरव्हेंशन टीममधील (HIT) पोलीस अधिकाऱ्याची कथा आहे. दिग्दर्शक शैलेश कोलानू यांनी मुळ तेलुगु चित्रपट केला होता. हिंदी रिमेकचे दिग्दर्शनही तेच करणार आहेत.

"जेव्हा मी एचआयटी (मूळ तेलुगु चित्रपट) पाहिला, तेव्हा मी तत्काळ त्यांच्याशी संपर्क साधला. ही एक मनोहारी कथा आहे, आजच्या वातावरणाशी संबंधित. एक अभिनेता म्हणून मी नेहमीच यापूर्वी न केलेल्या पात्राच्या शोधात असतो आणि एचआयटी मला ती संधी देत आहे. मी हा प्रवास शैलेश आणि (निर्माता) दिल राजू यांच्यासमवेत करण्यासाठी उत्सुक आहे," असे राजकुमार राव म्हणाला.

हिंदी रिमेकवर काम करण्याबद्दल दिग्दर्शक शैलेश कोलानू म्हणाले: "एचआयटीची पहिली घटना एका पोलीस अधिकाऱ्याची कहाणी सांगते जी आपल्या भूतकाळातील आणि त्याच्या वर्तमानाबरोबर सतत लढाई लढत असते. म्हणूनच हे एक अस्वस्थ पात्रे आहे. तो गडदपणा भूमिकेमध्ये आणेल अशा व्यक्तीला मला कास्ट करायचे होते. मला वाटतं राज त्या प्रकारचा प्रतिसाद देऊ शकेल. शैतान पाहिल्यापासून राजकुमारचे काम मी फॉलो करीत आहे. तो एक अफाट अभिनेता आहे आणि त्याने दर वेळी आपल्याला आश्चर्यचकित केले आहे. एचआयटी चित्रपटाला दक्षिणेमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तसाच तो हिंदीतही मिळेल अशी दिग्दर्शकाची आहे.

हेही वाचा - कॉमेडियन झाकीर खानचा नव्या शोसाठी अ‍ॅमेझॉनसोबत मोठा करार

याबद्दल आपले विचार सांगताना दिग्दर्शक म्हणाले, "होय, मी पाहतो, की एचआयटी बॉलिवूडमध्ये यशस्वी फ्रँचायझी बनण्याची क्षमता आहे. मला वाटते की एचआयटीचा आधार खूप जागतिक आहे. अर्थात मी संवेदनांच्या अनुषंगाने अगदी किरकोळ बदल करीन. संपूर्ण भारतभरातील प्रेक्षकांचा विचार करून हा बदल असेल. "शाहिद कपूरसोबत हिंदीमध्ये नानीच्या 'जर्सी'चा रिमेक करणारा निर्माता दिल राजू, कुलदीप राठौर यांच्यासह या चित्रपटाचा सहनिर्माता आहे. हा चित्रपट प्री-प्रॉडक्शनमध्ये आहे आणि 2021मध्ये तो फ्लेअरवर जाईल. इतर तपशील लवकरच जाहीर केला जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details