मुंबई- 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच एका हॉरर कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रूही अफ्झा' असं या चित्रपटाचं शीर्षक असून यात ती राजकुमार रावसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
'रूही अफ्झा'मध्ये जान्हवीसोबत स्क्रीन शेअर करण्याबाबत राजकुमार राव म्हणतो.... - horror comedy
राजकुमारनं नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीसोबतचा कामाचा अनुभव सांगितला आहे. चित्रपटातील आपल्या सहकलाकाराबद्दल बोलताना राजकुमारनं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
राजकुमारनं नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीसोबतचा कामाचा अनुभव सांगितला आहे. चित्रपटातील आपल्या सहकलाकाराबद्दल बोलताना राजकुमारनं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जान्हवी अतिशय मेहनती आणि कामाप्रती प्रामाणिक अभिनेत्री असल्याचं सांगत 'धडक'मधील तिचा अभिनय ही याची फक्त एक झलक होती, असं राजकुमार म्हटला.
या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आग्रामध्ये जून महिन्यातच सुरूवात झाली आहे. जान्हवीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन हार्दिक मेहता करत असून दिनेश विजन आणि म्रीघदीप सिंग यांची निर्मिती असणार आहे. हा चित्रपट २०२० मध्ये २० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.