मुंबई - अभिनेता राजकुमार राव याचा आगामी "हम दो हमरे दो" हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यात तो वेगळ्या प्रकारे विनोदी भूमिका साकारणार आहे. हास्यास्पद परिस्थितीत अडकलेल्या गंभीर माणसाची ही भूमिका आहे. अभिषेक जैन दिग्दर्शित या चित्रपटात राव एक अनाथ व्यक्ती आहे. जो त्याची प्रेयसी क्रिती सॅननसोबत लग्न करण्यासाठी आई वडील दत्तक घेतो.
अभिनेता परेश रावल हे राजकुमारच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत आणि रत्ना पाठकने आईची भूमिका साकारली आहे. राजकुमार राव म्हणाला की हा चित्रपट त्याच्या आधीच्या चित्रपटांपेक्षा वेगळा आहे.
एका मुलाखतीत राजकुमार राव म्हणाला, 'हा एक वेगळ्या प्रकारचा विनोदी चित्रपट आहे. मी आधी केलेल्या भूमिकांपेक्षा हे वेगळे आहे. माझे पात्र अशा व्यक्तीचे आहे, जो नेहमी काही ना काही संकटात सापडतो. हे 'स्त्री', 'लुडो' किंवा 'बरेली की बर्फी' मध्ये साकारलेल्या पात्रासारखे नाही.